MHADA Lottery 2023 : म्हाडाची घरे परवडणाऱ्या किमतीत मिळणार, म्हाडाची ऑक्टोबर महिन्यात पुन्हा लॉटरी होणार..!

MHADA Lottery 2023

म्हाडाची परवडणारी घरे: म्हाडाची घरे परवडणाऱ्या किमतीत मिळणार, म्हाडाची ऑक्टोबर महिन्यात पुन्हा लॉटरी होणार,

10 हजार घरांसाठी सोडत काढण्यात येणार, ऑगस्ट महिन्यापासून नागरिक यासाठी अर्ज करू शकतात.

   मुंबई : ऑक्टोबर महिन्यात म्हाडाच्या सुमारे 10 हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे.

या 10 हजार घरांमध्ये पुण्यातील पाच हजार, कोकण विभागातील सुमारे साडेचार हजार आणि औरंगाबाद विभागातील सुमारे

600 घरांचा समावेश आहे. या घरांची जाहिरात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात येईल.

त्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि लॉटरीचा निकाल ऑक्टोबरमध्ये जाहीर होईल.

   म्हाडाच्या मुंबई विभागातील ४ हजार ८२ घरांच्या सोडतीचा निकाल नुकताच जाहीर झाला.

Free Silae Machine :- मोफत शिलाई मशीन फॉर्म भरून 9300 रुपये मिळवा..

यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाच्या घरांच्या किमती थोड्या कमी कराव्यात, असे मत व्यक्त केले होते.

त्यामुळे नव्याने वाटप झालेल्या घरांचे दर कमी होतील का, हे पाहावे लागेल. 25ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध

झाल्यानंतर 10,000 घरांसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होईल.  यामध्ये पुण्यातील सर्वाधिक ५ हजार घरांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे ही घरे शहरातील नामवंत बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

सोडतीमध्ये अति निम्न, निम्न, मध्यम आणि उच्च अशा सर्व उत्पन्न गटातील घरांचा समावेश आहे.

यासोबतच पुणे, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथील घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे.

दुसरीकडे कोकण मंडळानेही चार हजार घरांच्या लॉटरीच्या जाहिरातीच्या कामाला गती दिली आहे.

Gold price update : सोन्याच्या दरात घसरण, बाजारात खरेदीसाठी गर्दी..!

ठाणे, विरार-बोळींज, डोंबिवली आदी ठिकाणच्या सुमारे साडेचार हजार घरांसाठी ऑगस्टअखेर जाहिरात दिली जाणार आहे.

औरंगाबाद विभागाचे मुख्याधिकारी मंदार वैद्य यांनी सांगितले की, औरंगाबाद विभागानेही सुमारे 600 घरांच्या लॉटरीच्या जाहिरातीची

तयारी सुरू केली आहे. औरंगाबाद, अंबेजोगाई, लातूर येथील घरांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

एकंदरीत दसऱ्याच्या मुहूर्तावर उमेदवारांना आपले खरे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आहे. MHADA Lottery 2023

म्हाडाची लॉटरी पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

   म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होतील का? (MHADA Lottery 2023) 

   मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी नुकतीच लॉटरी जाहीर झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाच्या घरांच्या किमती कमी केल्या पाहिजेत, असे मत व्यक्त केले होते.

Gold Price Update : सोन्याच्या भावात अचानक मोठी घट, पाहा 14 ते 24 कॅरेटचा भाव

म्हाडाला गृहप्रकल्पांसाठी मोफत जमीन मिळत असल्याने घरांच्या किमती खासगी विकासकांच्या प्रकल्पांपेक्षा कमी असाव्यात.

म्हाडाच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. तसेच पुढील ब्लॉकमधील घरांच्या किमती इतर घरांच्या

तुलनेत कमी असतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे आता म्हाडा त्याची अंमलबजावणी करणार की नाही हे पाहावे लागेल.

म्हाडाची लॉटरी पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

Leave a Comment

error: Content is protected !!