farmer scheme : गाय गोठा अनुदान महाराष्ट्र २०२३|Form pdf|शरद पवार ग्रामसमृद्धी योजना..!

गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 

गाय पालन योजना महाराष्ट्र या योजनेत गायींच्या गोठा बांधकामासाठी महाराष्ट्र शासन अनुदान देणार आहे.शेतीला पूरक असा सर्वोत्तम व्यवसाय आहे.

फक्त शेतीतील उत्पन्नावर अवलंबून न राहता गाय पालन हा जोडधंदा अनेक शेतकरी करत असतात.

त्यामुळेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी शासनाकडून ही योजना राबविण्यात येत आहे.

गाय गोठा अनुदान योजनेची pdf डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा 

गाय गोठा /शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेमध्ये काय मिळणार (farmer scheme) 

गाई व म्हशींना पक्का गोठा बांधणे .

 कुक्कुटपालन/पोल्ट्री शेड बांधणे.

 शेतीसाठी शेड बांधणे.

भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग.

गाय गोठा अनुदान योजनेचे उद्देश 

१) या योजनेचा मुख्य उद्देश हा शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे.

२) शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक प्रगती साधणे.

३) जनावरांचे संरक्षण करणे.

४) शेतकर्‍यांना आर्थिक सहाय्य करुन विकास करणे.

Pik vima yadi : पीक विमा महाराष्ट्र यादी हेक्टर 25,000 हजार रुपये बँक खात्यात जमा..!

गाय गोठा अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्र 

१) अर्जदाराचे आधार कार्ड

२) रेशनकार्ड

३) अर्जदाराचा पासपोर्ट साइट फोटो

४) अर्जदाराला एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला

५)अर्जदाराचे मतदान ओळखपत्र

६)अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा

७)अर्जदार ग्रामीण भागातील रहिवासी असावा

८)जात प्रमाणपत्र

९) जन्म प्रमाणपत्र

१०)या योजनेसाठी इतर कोणत्याही योजनेंतर्गत गाय गोठा अनुदान मिळालेले नसावे , असे घोषणापत्र जोडणे आवश्यक

११) ज्या जागेत गोठा बांधण्यात येणार आहे त्याचे संमतीपत्र/ना हरकत प्रमाणपत्र

१२) ग्रामपंचायत शिफारस पत्र

१३) अल्पभूधारक प्रमाणपत्र

१४) पशुधन पर्यवेक्षक, सरपंच व ग्रामसेवक यांनी दिलेले पशुधन उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र

१५) कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र किंवा जॉब कार्ड आवश्यक

१६) गोठा बांधण्याचे अंदाजपत्रक सोबत जोडणे आवश्यक

गाय गोठा अनुदान योजनेची pdf डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा 

गाय गोठा अनुदान योजनेत कोणता लाभ मिळणार?

१) गाई व म्हशींसाठी पक्का गोठा –

गाई व म्हशींना शेतकऱ्यांकडे योग्य निवारा नसल्यामुळे आरोग्य नीट राहत नाही , तसेच शेण व्यवस्थित न काढल्यावर रोग होतात.

यामुळेच या योजनेत गाई व म्हशींसाठी पक्का गोठा बांधण्यासाठी शासनाने अर्थसाहाय्य केले आहे.

एका गोठ्यासाठी ७७ हजार १८८ रुपये अनुदान मिळेल. २ ते ६ गुरे या करिता एक गोठा व त्यानंतर

६च्या पटीत १२ गुरांसाठी दुप्पट आणि १८ पेक्षा जास्त गुरांसाठी ३ पट अनुदान शासन देणार आहे.

२) भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग –

नाडेप कंपोस्टिंग युनिटसाठी १०५३० रुपये अनुदान शासनाकडून मिळणार आहे, दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या रासायनिक खताच्या

वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे तसेच मृदेतील आवश्यक सेंद्रीय घटक कमी होत आहेत.

त्यामुळेच मृदेतील कस टिकून राहावा आणि कंपोस्ट खताचा वापर वाढून सेंद्रीय पद्धतीने अन्नधान्याचे उत्पादन व्हावे हा शासनाचा हेतू आहे. farmer scheme 

Pik vima yadi : एकूण 22 हजार 500 आणि 25 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना वितरित..!

३) कुक्कुटपालन/पोल्ट्री शेड उभारणे –

१०० कोंबड्याच्या कुक्कुटपालन शेडसाठी ४९७६० रुपयांचे अनुदान मिळणार आहे. तर ही संख्या १५० च्या वर असल्यास दुप्पट निधी शासन उपलब्ध करून देणार आहे.

४) शेळीपालन शेड बांधणे –

एका शेडसाठी ४९२८४ रुपये अनुदान तर एका लाभार्थ्यास ३० शेळ्यांसाठी ३ पट अनुदान मंजूर करण्यात येणार आहे .

Leave a Comment

error: Content is protected !!