ग्रामपंचायत यादी
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या गावात ग्रामपंचायत मध्ये कोणती योजना राबवली जाते आणि कोणत्या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येईल
यासंबंधीची सर्व माहिती मोबाईल मध्ये कशी बघायची आजच्या या माहितीमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत.
आपल्या ग्रामपंचायत मध्ये विविध प्रकारच्या योजना हे राबवल्या जातात त्यापैकी विहीर बांधणे,
शरद पवार ग्राम समृद्धी योजना, गाई गोठा अनुदान योजना व अशाप्रकारे इतर विविध योजना देखील राबवल्या जात असतात.
परंतु तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मध्ये न जाता तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये बघू शकता यापैकी कोणती योजना तुमच्या ग्रामपंचायत मध्ये मंजूर झाली आहे
की नाही अशा प्रकारे तुम्ही इतर विविध योजना देखील मोबाईल मध्ये बघू शकता त्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत मधील राबवणाऱ्या योजनेची
माहितीसाठी सर्वप्रथम तुम्हाला मनरेगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
खालील दिलेल्या लिंक ला तुम्ही क्लिक करून मनरेगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. Grampanchayat list
योजनांचा लाभ कोणी घेतला हे पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा (grampanchayat list)
गुगलमध्ये MGNREGA असे सर्च करा किंवा डायरेक्ट लिंक – https://nrega.nic.in/HomeGP_new.aspx
सर्च केल्यानंतर Grampanchayat Report वरती क्लिक करा. तुमच्यासमोर ग्रामपंचायत रिपोर्ट पेज ओपन होईल.
Data Entry, Generate Reports इतर पर्याय दिसतील त्यामधून Generate Reports हा पर्याय निवडा.
संपूर्ण राज्याची लिस्ट ओपन होईल त्यामधून आपले राज्य निवडा.
Grampanchayat Report Module Log in page ओपन होईल.
प्रथम ज्या वर्षाची लाभार्थी यादी पाहायची आहे, ते वर्ष / Financial Year निवडा, आपला जिल्हा,
तालुका, गाव / पंचायत निवडा आणि यानंतर आपल्यासमोर R1 R2 R3 R4 R5 R6 इ. पर्याय दिसतील.
वरील पर्यायापैकी तुम्हाला R6 मध्ये Work Register वरती क्लिक करा.
तुम्हाला योजनेच्या लाभार्थ्यांची यादी /माहिती पाहायला मिळेल. तसेच कोणत्या योजनेचा लाभ घेतला आहे हे सुद्धा पाहता येईल.