महाराष्ट्रात या तारखेला मान्सून लावणार हजेरी,पंजाब डख यांचा हवामान अंदाज

Monsoon महाराष्ट्रात या तारखेला मान्सून लावणार हजेरी, पहा काय आहे पंजाब डख यांचा हवामान अंदाज

शेतकऱ्यांसाठी पंजाबराव डख यांचा मान्सून 2023 संदर्भातला हवामान अंदाज सांगितला आहे. पंजाबराव डख यांनी वेळोवेळी दिलेले अंदाज आणि त्यानुसार झालेला पाऊस यामुळे शेतकरी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या अंदाजांची वाट पाहात असतात.

पंजाबराव डख हवामान अंदाज

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी महाराष्ट्रामध्ये 8 जून ला मान्सून चे आगमन होईल. सोबतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 22 जून पर्यन्त मान्सून पोहोचणार आहे. punjab dakh havaman andaj

पंजाब डख यांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांच्या पेरण्या 27 तर 30 जून पर्यन्त होणार, ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या या कालावधीत होणार नाहीत त्या शेतकऱ्यांच्या पेरण्या जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात पूर्ण होतील असा अंदाज डख यांनी यावेळी वर्तविला आहे.

यावर्षीचा पाऊस जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात अधिक असणार आहे. तर जुलै च्या तुलनेत ऑगस्ट, सप्टेंबर  ऑक्टोबर मध्ये अधिक पाऊस राहणार असं पंजाबराव डख यांनी यावर्षीच्या मान्सून हवामान अंदाजात सांगितले. weather forecast

पंजाबराव डख यांच्या माहितीनुसार यावर्षीचा मान्सून देखील 2022 सारखाच पाऊस देईल. यंदा 2022 सारखाच पाऊस असल्याने कृष्णा नदी काठावर यावर्षीही महापूर येण्याची शक्यता असल्याचा दावा डख यांनी केला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!