Soyabean:सोयाबीन भावात 200ते400 रुपयांनी वाढ.

Soyabean Rate : सोयाबीन चे बाजार भावात 200 ते 400 रुपयांनी वाढ,येथे पाहा सोयाबीन चे नवीन दर.

Soybean Rate Update : नमस्कार शेतकरी मित्रानो आज देशातील बाजारात सोयाबीन दरातील सुधारणा कायम आहे. मागील आठवडाभरात सोयाबीन दरात क्विंटलमागं 200 ते 400 रुपयांची सुधारणा पाहाला मिळाली.तर आंतरराष्ट्रीय बाजारात दर काहीसे स्थिरावले आहेत. पण कच्चा इंधनाच्या दरात झालेल्या वाढीमुळे खाद्यतेलासह सोयातेल बाजारालाही आधार मिळत आहे.

सोयाबीन चे बाजार समिती नुसार दर पाहण्यासाठी
येथे क्लिक करा.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर पूर्वपातळीवर पोचले. मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यापासून बॅंकिंग क्षेत्रातील संकटामुळं सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाचे दरही पडले होते. पण मागील आठवड्यात दरात पुन्हा सुधारणा पाहायला मिळाली.

आज सायंकाळपर्यंत सोयाबीनचे वायदे १५.२० डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. सोयाबीनने १५.२५ डाॅलरचा टप्पा गाठल्यानंतर दरात काहीसे चढ उतार येत आहेत.

सोयाबीन चे बाजार समिती नुसार दर पाहण्यासाठी
येथे क्लिक करा.

मागील दोन दिवसांपासून दर या पातळीच्या पुढे टिकत नाहीत. पण दरात घट होण्याची शक्यता कमीच आहे, असे जाणकारांनी सांगितले.

सध्या बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ५०० रुपयांचा दर मिळतोय. दुसरीकडे बाजारातील आवकही अधिक आहे.

सोयाबीन चे बाजार समिती नुसार दर पाहण्यासाठी
येथे क्लिक करा.

kukutpalan:कूकुट पालनसाठी मिळणार१,६८०००रू लगेच करा अर्ज

 

Leave a Comment

error: Content is protected !!