Cm Kisan Samman Nidhi
केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या पीएम किसान सन्मान योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्य
शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (Cm Kisan Samman Nidhi) नव्याने सुरू करण्यात आली आहे.
पीएम किसान सन्मान योजने (Cm Kisan Samman Nidhi) प्रमाणेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 6 हजार रुपये शेतकऱ्यांना वितरीत केले जाणार आहेत.
आता याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. चला तर मग काय शासन निर्णय घेण्यात आला आहे ते जाणून घेऊयात.
सीएम किसान योजनेची अधिक माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Cm Kisan Samman Nidhi कोणाला मिळणार लाभ?
आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात जवळपास 1.15 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
केंद्र सरकारने जमिनाधारक शेतकरी आणि तसेच पीएम किसान सन्मान
निधीचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेमध्ये समाविष्ट केले आहे. राज्य शासनाला या योजनेच्या
अंमलबजावणीसाठी 6 हजार 900 कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. तसेच पी. एम. किसान पोर्टल वर नव्याने
नोंदणी होऊन लाभ मिळालेले पात्र लाभार्थी देखील या योजनेचे लाभार्थी राहतील.
याबतचा निर्णय घेण्यात आला आहे. पी. एम. किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या
निकषानुसार लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहणार आहेत.
सीएम किसान योजनेची अधिक माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा
काय आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना?
शासनाच्या या नवीन नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्यांना दुप्पट फायदा होणार आहे.
ज्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 6 हजार रुपये वार्षिक दिले जात आहेत.
परंतु आता या नवीन योजनेमुळे शेतकऱ्यांना 12 हजार रुपये वार्षिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
सीएम किसान योजनेची अधिक माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा
शेतकऱ्यांना कधी मिळणारं हप्ता?
शेतकऱ्यांना नवीन नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पहिला हप्ता एप्रिल ते जुलै महिन्यात मिळू शकतो.
तर दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या महिन्यात मिळू शकतो.
शेतकऱ्यांना या योजनेचे प्रति हप्ता 2 हजार रुपये असे तीन हप्त्याचे 6 हजार रुपये मिळणार आहेत. Cm Kisan Samman Nidhi
