पीक विमा अपडेट
यावर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिकविमा हि योजना सुरू केली आहे.
या योजनेला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेच्या लाभापासून एकही शेतकरी वंचित राहू नये.
म्हणून पिकविमा भरण्यासाठी राज्य सरकारने 03 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली आहे. परंतु पिकविमा मिळवण्यासाठी काही
महत्त्वाच्या अटी सरकारने निश्चित केल्या आहेत त्या अटीची पुर्तता केल्याशिवाय शेतकरी पिकविम्यासाठी पात्र होत नाही.
सरकारने पिकविमा मिळवण्या साठी शेतकऱ्यांना आवश्यक बाबीची पुर्तता करण्याचे आवाहन केले आहे.
जाणून घ्या कोणकोणत्या अटी पूर्ण केल्याशिवाय शेतकरी पिकविम्याच्या लाभासाठी पात्र होत नाही..
अधिक माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा
1) ई-पिक (e-pik pahani) पाहणी करणे…(crop insurance )
सरकारच्या नियमावली नुसार शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद करणे अनिवार्य आहे.
पिकाची नोंद ही ई-पिक (E-pik pahani) पाहणी या ॲप्लिकेशन च्या माध्यमातून पुर्ण करावी.
india post gds recruitment 2023 | भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये 30,000 जागा, येथे ऑनलाइन अर्ज करा
ई-पिक पाहणी केली नाही तर तुमची जमीन पडीक गृहीत धरली जाऊन पिकविमा, नुकसान भरपाई मिळवण्यासाठी तुम्ही अपात्र व्हाल.
तरी अजूनही तुमची ई-पिक पाहणी करणे बाकी असेल तर लवकर ई-पिक पाहणी पुर्ण करा…(Crop insurance scheme maharashtra)
अधिक माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा
2) पिकाचे नुकसान झाल्यास 72 तासांच्या आत क्लेम करा..
(Insurance scheme 2023) शेतकरी मित्रांनो कोणत्याही प्रकारच्या आपत्ती पासून आपल्या
पिकाचे नुकसान झाल्याची माहिती विमा कंपनीला 72 तासांच्या आत कळवणे बंधनकारक आहे. जेव्हा अवकाळी पाऊस,
गारपीट, दुष्काळ, सततचा पाऊस होईल तेव्हा 72 तासांच्या आत नुकसान झाल्याची माहिती विमा कंपनीला द्यावी.
पिक नुकसानीची माहिती देण्यासाठी crop insurance या ॲप्लिकेशन चा वापर करावा.
शेतकरी मित्रांनो विमा भरल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती पासून नुकसान झाले तर
आपल्याला पिकविमा मिळेल असे शेतकऱ्यांना वाटत असते परंतु विमा कंपनीच्या नियमानुसार वरील दोन कामे शेतकऱ्यांना करणे बंधनकारक आहे.