Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर, अनिल देशमुखांच्या जागी लेकाला उमेदवारी!
Maharashtra Assembly Election 2024 Updates : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यास दोनच दिवस शिल्लक राहिल्याने शक्तीप्रदर्शन करून अर्ज दाखल केले जाणार आहेत.
Maharashtra Politics Updates Today : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरचे दोन दोन दिवस शिल्लक
असतानाही महायुती आणि महाविकास आघाडीतील घोळ संपलेले नाहीत.
दोन्ही आघाड्यांतील सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे.
बंडोबांना शांत करण्याची मोहीम पक्षांच्या नेत्यांना हाती घ्यावी लागली आहे.
महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम असतानाच महाविकास आघाडीतील सुंदोपसुंदीही चव्हाट्यावर आली आहे.
तर, आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास वेग येणार आहे.
काहींनी गुरुपुष्यामृत योग म्हणजेच २४ ऑक्टोबर रोजी अर्ज भरले.
तर, उर्वरित आज आणि उद्यामध्ये अर्ज दाखल करतील.
बारामती विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अजित पवार
आणि युगेंद्र पवार यांनी आज अर्ज दाखल केले आहेत.
तर, ठाण्यात संजय केळकर, एकनाथ शिंदेा यांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलंय.
आतापर्यंत जाहीर झालेले उमेदवार किती?
आतापर्यंत जाहीर झालेले उमेदवार किती?
महाविकास आघाडी
👇👇
श्रीगोंदा विधानभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीमध्ये या उमदवारीवरून मोठी बिघाडी येते.
माजी आमदार राहुल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून उमेदवारीची जोरदार मागणी
केली होती. त्यांची उमेदवारी अंतिम मानली जात असतानाच अचानक फेरबदल होऊन अनुराधा नागवडे
यांना महाविकास आघाडी करून उमेदवारी देण्यात आल्यामुळे जगताप समर्थक नाराज असून ते आजच्या
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनुपस्थित होते एवढेच नव्हे तर उद्या २९ तारखेला अपक्ष म्हणून उमेदवारी
अर्ज भरणार असल्याची घोषणा देखील माजी आमदार राहुल जगताप यांनी केली आहे.
आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नीने साध्या पद्धतीने भरला उमेदवारी अर्ज
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा बबनराव
पाचपुते यांनी साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज भरला आहे.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगवेगळे चिन्ह घेऊन लढवणारे
आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना भारतीय जनता पक्षाकडून यावेळी उमेदवारी
जाहीर करण्यात आली. त्यांनी आज चित्रा वाघ यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरला.
यावेळी विक्रमसिंह पाचपुते उपस्थित होते.
उमेदवार बदलण्यास पक्षाचा नकार
भारतीय जनता पक्षाने पहिल्याच यादीमध्ये प्रतिभा पाचपुते यांचे नाव जाहीर केले. यानंतर मुंबई
मागील वीस वर्ष रत्नागिरी वनवासात गेल्याने आता जनतेला बदल हवा आहे – बाळ माने
रत्नागिरी : महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे सुरेंद्र तथा बाळ माने यांनी .
- सोमवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या
- निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना कार्यालयाबाहेर झालेल्या मेळाव्याला हजारो
- शिवसैनिकांसह महाविकास