Onion Rate live today : अखेर कांद्याने सहा हजारांचा टप्पा गाठला; महाराष्ट्रातील ‘या’ बाजारात कांद्याला ६ हजारांचा भाव, वाचा सविस्तर
या बाजारात काल झालेल्या लिलावात उन्हाळ कांद्याला किमान 5000,
कमाल 6000 आणि सरासरी 5500 असा विक्रमी भाव मिळाला.
महत्त्वाचे म्हणजे पुढील काही दिवस कांद्याच्या दरात तेजी राहण्याची शक्यता बाजार
विश्लेषकांनी वर्तवली आहे.
Onion Rate live today : लोकसभा निवडणुकीत कांद्याने महाआघाडीचा पराभव केला.
लोकसभा निवडणुकीत महाआघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांचा कांद्याच्या मुद्द्यावरून पराभव झाला.
यात काही केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश होता हे विशेष. दरम्यान,
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही कांद्याचा मुद्दा ऐरणीवर येऊ नये,
यासाठी सरकार काळजी घेत आहे.
गेल्या सप्टेंबरमध्ये केंद्राने कांदा निर्यातीवर लागू असलेले निर्बंध शिथिल करण्याचा मोठा निर्णय घेतला.
कांदा निर्यातीवर लागू होणारे निर्यात शुल्क 40 टक्क्यांवरून 20 टक्के करण्यात आले.
पुणे मार्केट बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तसेच निर्यातीसाठी लागू असलेले किमान निर्यात मूल्य काढून टाकण्यात आले.
आता या निर्णयाचा फायदा कांदा उत्पादकांना होताना दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून कांद्याला विक्रमी भाव मिळत आहेत.
दरम्यान, काल झालेल्या लिलावात राज्यातील महत्त्वाच्या बाजारपेठेत उन्हाळ
कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक ६ हजार रुपये भाव मिळाला.
ऑल महाराष्ट्र कांदा बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार,
राज्यातील रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल 20 ऑक्टोबर रोजी झालेल्या
लिलावात उन्हाळ कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला.
या बाजारात काल झालेल्या लिलावात उन्हाळ कांद्याला किमान 5000,
कमाल 6000 आणि सरासरी 5500 असा विक्रमी भाव मिळाला.
महत्त्वाचे म्हणजे पुढील काही दिवस कांद्याच्या दरात तेजी राहण्याची शक्यता बाजार विश्लेषकांनी वर्तवली आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
जोपर्यंत नवीन लाल कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येत नाही तोपर्यंत भाव वाढतच राहणार आहेत.
काही तज्ज्ञांनी तर डिसेंबरपर्यंत बाजारभाव असेच राहतील, असे सांगितले आहे.
त्यामुळे भविष्यात कांद्याचे भाव कसे राहतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे
. मात्र, भविष्यात सध्याचा भाव असाच राहिला तर त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.