Paus Andaj : राज्यात तीन दिवस पावसाचा अंदाज; राज्यातील अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज
Pune News : हवामान विभागाने राज्यातील काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला.
तर दुपारी ऑक्टोबर हीटही जाणवत आहे. दुसरीकडे माॅन्सूनचा
परतीचा प्रवास सलग पाचव्या दिवशी म्हणजेच आजही थबकलेला होता.
पावसाचे अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा
माॅन्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा थबकला आहे. माॅन्सूनने आतापर्यंत जम्मू आणि काश्मिर,
लडाख-गिलगिट-बाल्टीस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाना-चंदीगड-
दिल्ली आणि राजस्थानच्या सर्व भागातून माघारी फिरला.
तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागातून माघार घेतली.
पण ५ दिवसांपासून माॅन्सून एकाच जागेवर आहे.
म्हणजेच आजही माॅन्सूनची सिमा नौटनवा, सुलतानपूर,
पन्ना, नरमदापुरम, खरगोन, नंदूरबार आणि नवसारी भागात होती.
माॅन्सून पुढील २ ते ३ दिवसांमध्ये गुजरात, मध्य प्रदेशच्या उर्वरित भागातून माघारी फिरेल.
तर महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून माघार घेईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
हवामान विभागाने आज राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या
गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
तर विदर्भातील बुलडाणा,
वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला.
Paus Andaj : राज्यात तीन दिवस पावसाचा अंदाज; राज्यातील अनेक भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज
New update
शनिवारी सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे,
नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड
जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज
हवामान विभागाने दिला. रविवारी सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सातारा, सांगली,
पुणे, नाशिक, नगर, धुळे, नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, धाराशिव
या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.