सोयाबीनची तननाशकाची फवारणी
सोयाबीनची पेरणी करताना पेरणीचा मागे लगेच ४८ तासात तननाशकाची फवारणी करत असताना कोणत्या कोणत्या
औषधी वापराव्यात फवारणी करताना कोणती दक्षता घ्यावी म्हणजे आपल्याला संपूर्ण गवतावर नियंत्रण मिळवता येईल, व सोयाबीन उत्पादनात वाढ करता येईल.
ban fertilizer : या’ खताचा राज्य सरकारकडून परवाना रद्द, हे खत वापरू नका
सोयाबीन मध्ये तननाशकाचे दोन प्रकार आहेत त्यातील एक पेरणीमागे लगेच ४८ तासात आणि दुसरे सोयाबीन
पेरणीला २१ दिवस पुर्ण होताच तरी या पोस्टमध्ये सोयाबीनची पेरणी मागे लगेच ४८ तासात तननाशकाची
फवारणी करताना कोणती दक्षता घ्यावी कोणत्या कोणत्या औषधी वापराव्या याची संपूर्ण माहिती घेऊया.
अधिक माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा
सोयाबीनमधील तननाशकाचे Soybean herbicide tannashak प्रकार:
सोयाबीन उत्पादनात अनेक प्रकारची तणनाशके वापरली जातात. काही सर्वात सामान्य प्रकारांमध्ये हे समाविष्ट आहे:
ग्लायफोसेट: हे ब्रॉड-स्पेक्ट्रम तणनाशक आहे जे खूप साऱ्या प्रकारचे तण नष्ट करते, ज्यामध्ये ब्रॉडलीफ आणि गवत दोन्ही समाविष्ट आहेत.
हे उदयोन्मुख आणि बीजारोपण दोन्ही तण नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे. ग्लायफोसेट हे सोयाबीन उत्पादनात सर्वाधिक वापरले जाणारे तणनाशक आहे.
गट २ तणनाशके: ही तणनाशके देखील विस्तृत-स्पेक्ट्रम आणि तणांच्या विस्तृत श्रेणीविरूद्ध प्रभावी आहेत.
परंतु ते ग्लायफोसेट-प्रतिरोधक तणांवर ग्लायफोसेटइतके प्रभावी नाहीत. सोयाबीनमध्ये वापरल्या जाणार्या काही
सामान्य गट २ तणनाशकांमध्ये ग्लुफोसिनेट, इमाझेथापीर आणि क्लोरीमुरॉन यांचा समावेश होतो.
गट १५ तणनाशके: ही तणनाशके रुंद पानांवरील तणांवर प्रभावी आहेत, परंतु गवत नाही.
ते सहसा इतर तणनाशकांच्या संयोगाने हंगामात तण नियंत्रणासाठी वापरले जातात..
सोयाबीनमध्ये वापरल्या जाणार्या काही सामान्य गट १५ तणनाशकांमध्ये पायरॉक्सासल्फोन, सल्फेन्ट्राझोन आणि मेसोट्रिओन यांचा समावेश होतो.
गट 14 तणनाशके: ही तणनाशके गवतांवर परिणामकारक आहेत, परंतु रुंद पानांच्या तणांवर नाही.
ते सहसा इतर तणनाशकांच्या संयोगाने हंगामात तण नियंत्रणासाठी वापरले जातात..
सोयाबीनमध्ये वापरल्या जाणार्या काही सामान्य गट 14 तणनाशकांमध्ये एसीटोक्लोर, फोमेसेफेन आणि ट्रायफ्लुरालिन यांचा समावेश होतो.
Dairy Farming Loan स्वतःचा दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार 7 लाख रुपये अनुदान, असा करा अर्ज
उगवण पूर्व तननाशक tannashak:
1) स्ट्राँगआर्म
उगवण पूर्व तननाशकामधे नंबर एकला डुपाँन्ड चे स्ट्राँगआर्म असून या औषधाचे शेतकर्त्यांना खूप चांगले रिझर्ट भेटलेले आहेत.
स्ट्राँगआर्मचे प्रमाण एक एकरसाठी १२.४ gm ची पँकींग इतके वापरावे. स्टाॅगआर्म ची फवारणी करताना एक एकरसाठी १५/१८ लिटर च्या पंपाने १० पंप करणे गरजेचे आहे.
फवारणी करताना जमीनीत ओलावा असणे सुद्धा खुप गरजेचे आहे. जमीनीत चांगला ओलावा नसला tar तनांवर १०० % नियंत्रण मिळवता येणार नाही.
उगवण पूर्व तननाशकामधे स्टाॅगआर्म हे तननाशक खूप शेतकऱ्यांची पसंत बनले आहे.
2) BASF-volor ३२
उगवण पुर्व तननाशकामधे BSSF चे volar 32 हे तननाशक चांगल्या quality चे आहे.
यामधे ( pendimethalin ३०% +Imazethapyr 2% EC ) हा घटक असुन याचे सोयाबीनसाठी एकरी एक लिटर तर मुगासाठी
८०० ml तर हरबर्यासाठी ५०० ml एवढे प्रमाण दिलेले आहे. हे तननाशक पिकातील तनावर ५० ते ६० दिवस पर्यंत नियंत्रण घालते.
Crop Insurance : कापूस आणि सोयाबीनला मिळणार 50 हजार रुपयांचा पिक विमा,गावानुसार यादी पहा
फवारणी करताना प्रमाणापेक्षा जास्त फवारू नये. अन्यथा पिकावर याचे उलटा परिणाम होऊ शकतात.
3) Authority
उगवण पूर्व तननाशकामधे आणखी एक प्रसिद्ध Authority हे तननाशक चांगले असून यामधे (sulfentrazone २८ % +clomazone 30 % wp) हा घटक आहे.
याची बरोबर मात्रा एक एकरसाठी ५०० gm एवढी देण्यात आली आहे. याची फवारणी करताना २०० लिटर पाण्यामधे मिसळुन करण्यात यावी.
पेरणीनंतर ४८ तासाच्या आत याची फवारणी करण्यात यावी.याच्या फवारणी नंतर ४० दिवस पर्यत पिकातील तन येत नाही. soyabean
अधिक माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा
उगवण पूर्व तननाशकाची फवारणी करताना घ्यायची काळजी:
1) यातील कोणत्याही औषधाची फवारणी करताना औषधांचे प्रमाण कंपणीने सांगितल्या प्रमाणे योग्य प्रमाणात घ्यावे ,प्रमाण कमी अधिक करू नये.
2) एक एकर साठी १५०/२०० लिटर इतके पाणी वापरावे , काही शेतकरी पाणी कमी प्रमाणात आणि औषध जास्तीत जास्त वापरतात त्यांचे परिणाम चांगले भेटत नाही.
3) फवारणी करत असताना जमीनीत ओलावा असणे जमीन ओली असने खुप गरजेचे आहे. कोरड्या जमिनीत कोणत्याही औषधाचे चांगले परिणाम होत नसतात.
शेतकरी मित्रांनो वरील सांगितल्या माहिती प्रमाणे उगवण पूर्व तननाशकाची फवारणी करताना पूर्ण काळजी घ्या आणि सोयाबीन मधिल तनांवर नियंत्रण मिळवा.